हेडलाईन, फितुरांच्या विरोधात अनधिकृत वृक्षतोडीच्या विरोधात सात तरुणांनी न्यायाधीशांसमोर दंड थोपटले.
- Sameer Nikam

- Oct 26, 2018
- 1 min read

म्यानातून उसळे तलवारीची पात...
वेडात मराठे वीर दौडले सात.....
याप्रमाणेच आज घडलेल्या प्रकारांमध्ये माझे सहकारी यांचं कौतुक करावसं वाटतं कारण कल्याणीनगर येथील डॉक्टर सलीम अली पक्षी अभयारण्य येथे अनधिकृत रित्या 592 झाडे तोडण्यात आली परंतु यावर आजतागायत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही न्यायालयात दावा दाखल व्हावा यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न
करत होतो परंतु अधिकाऱ्यांची टाळाटाळ निदर्शनास येत होती परंतु आज दिनांक 26 10 2018 रोजी

सकाळी 11 वाजता शिवाजी नगर महानगर पालिका न्यायालयामध्ये सदर दाव्यामध्ये साक्ष नोंदवण्यासाठी आम्ही सात लोक प्रत्यक्ष जागेवर हजर झालो परंतु या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या मनाप्रमाणे साक्ष नोंदवण्याचा दबाव आमच्या वर टाकण्यात आला या दबावाला बळी न पडता आम्ही सदर ठिकाणी विरोध करून डायरेक्ट न्यायाधीशांसमोर आमचे गाऱ्हाणे मांडले दुर्दैव न्यायाधीशांनीही याप्रकरणी काही करू शकत नाही जोपर्यंत दावा माझ्या समोर येत नाही तोपर्यंत मी सदर प्रकरणी हस्तक्षेप करू शकत नाही आपण आपली तक्रार आयुक्तांकडे करावी असे उत्तर देऊन आपल्याकडील न्यायव्यवस्थेचे दर्शन आम्हाला दिले परंतु आम्ही एवढ्यावरच न थांबता सदर बाबतची
लेखी तक्रार आज आयुक्तांना दिली काही का असेना परंतु आम्ही सातही जणांनी कोणतीही माघार न घेता सरकारी वकील वृक्ष अधिकारी यांच्यासमोर ठोस भूमिका मांडून थेट न्यायाधीशांसमोर आमची बाजू मांडली यावेळी महेश धर्मराज युक्ता सत्य प्रदीप बिरेन समीर हे उपस्थित होते व पुन्हा एकदा सात मावळे जसे मोगलांच्या विरोधात धावले तसेच आज आम्हाला या फितुरांच्या विरोधात आवाज उठवण्याचा आनंद वाटत आहे.






Comments