उठ मानवा जागा हो पर्यावरण रक्षणाचा धागा हो!!
- Sameer Nikam

- Dec 5, 2018
- 2 min read

डॉक्टर सलीम अली पक्षी अभयारण्य काय आहे? चला जाणून घेऊया!
येरवडा येथील गुंजन टॉकीज च्या समोरील बाजूस म्हणजेच आत्ताच्या हिंदू स्मशान भूमी पासून ते नदीपात्र पर्यंत तसेच हरित पट्ट्यांमधून कल्याणी नगर पर्यंत एकंदरीत वीस ते बावीस एकरात व्यापलेला हा घनदाट झाडांचा परिसर. जेथे एकेकाळी वन विभागाकडून नर्सरी म्हणजेच रोपवाटिका थाटली गेली होती याच काळामध्ये असंख्य परदेशी पाहुणे म्हणजेच विविध प्रजातीचे पक्षी या ठिकाणी लाखो किलोमीटरचा प्रवास करून येत होते आजही येतात दुर्दैव त्यांची संख्या घटत चालली आहे यांना पाहण्यासाठी देशातीलच नव्हे परदेशातीलही पक्षीतज्ञ या ठिकाणी येत असे यातील अग्रगण्य नाव म्हणजे डॉक्टर सलीम अली यांच्या पदस्पर्शाने डॉक्टर गोळे डॉक्टर भरूचा या सर्वांच्या मुळेच या ठिकाणी असलेली नदीकाठची खाजगी जागा डॉक्टर फारूक वाडिया व कुटुंबीयांनी मोठ्या मनाने डॉक्टर सलीम अली पक्षी अभयारण्यासाठी देऊ केल्याचे घोषित केले व त्या जागेवरील ताबा देखील सोडला जोपर्यंत वनविभागाची रोपवाटिका या ठिकाणी होती तोपर्यंत या जागेचे वैभव टिकून होते आजही या जागेतील बराच सहभाग हा महाराष्ट्र शासनाच्या मालकीचा आहे परंतु या ठिकाणावरून वनविभागाने आपला काढून घेतला तेव्हापासून सदर जागेवर अतिक्रमणाचा पेव फुटला. जागेला कोणी वाली नाही अशी भूमिका प्रशासनानेच घेऊन जणू या जागेकडे दुर्लक्षच केले. त्यामुळे सदर जागा पक्षी अभयारण्यासाठी आरक्षित करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने मोजणीसाठी काही रक्कमही देण्यात आल्या, सदर प्रकरणी अनेक कागदांची रंगवा रंगवी झाली ,परंतु प्रत्यक्षात या ठिकाणी मात्र वृक्षतोडीचे प्रमाण सुरू झाले यावेळी पुणे महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण हे अस्तित्वात असतानाही व पुण्यातील जागृत पत्रकारांनी या विषयाकडे लक्ष वेधूनही प्रशासनाला जाग आली नाही! आज रोजी या ठिकाणी नव्हे तर नदीपात्र पर्यंत अतिक्रमण झाले आहे. एकाच रात्री 592 झाडांचा बळी घेण्यात आला याची तक्रार झाली वृत्तपत्रांनी दखलही घेतली! परंतु शासन मात्र याबाबत उदासीन आहे. हे या झाडांचे दुःख नसून.हे तुम्हा आम्हा सर्व पुणेकरांचे "दुर्दैव" म्हणावे लागेल . या वृक्षतोडीमुळे या भागातील जैवविविधता तसेच परदेशी पाहुणे म्हणजेच पक्षी भविष्यात आपल्या मुलांना दिसणार नाही. हे निश्चित परंतु अजूनही वेळ गेलेली नाही. आपण सर्वांनी या विषयाकडे प्रशासनाकडे दबाव निर्माण करणे गरजेचे झाले आहे. म्हणूनच माझ्यासाठी किंवा तुमच्यासाठी नसून, भविष्यात पुढच्या पिढीसाठी हा अनमोल ठेवा ही वृक्षसंपदा ही जागा अशीच हिरवाईने नटलेली पहायला मिळण्यासाठी आपल्याला आज एक तास देणे गरजेचे आहे .चला तर येरवडा येथे आठ तारखेला आपण सर्वजण सहकुटुंब भेटूयात पक्ष्यांसाठी पर्यावरणासाठी एक तास देऊयात.





Comments