top of page
  • Writer's pictureSameer Nikam

पुणे शहराची वृक्षसंपदा धोक्यात


नुकतेच येरवडा येथील डॉक्टर सलीम अली पक्षी अभयारण्यातील 592 झाडे बांधकाम व्यवसायिकांनी विनापरवाना तोडली असताना पुन्हा शहरातील मध्यभागी नामांकित बांधकाम व्यावसायिकाकडून पुन्हा बिना परवानगी वृक्षतोड केली जाते, याचा अर्थ पुणे शहरातील अनधिकृत वृक्षतोडीवर पुणे महानगरपालिकेचा कोणताही "कंट्रोल" राहिला नाही किंवा पालिकेतील अधिकारीच बांधकाम व्यावसायिकाने खरेदी केले की काय? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात येतो. परंतु यांच्यावर योग्य वेळी योग्य कारवाई केली नाही व असे आणखी चार-पाच बांधकाम व्यवसायिक पुणे शहरात असले तर पुणे शहर हे फक्त सिमेंट काँक्रीटचे जंगल झाल्याशिवाय राहणार नाही. हे निश्चित परंतु यातून पुणे शहरातील पुढच्या पिढीचा विचार करणे गरजेचे आहे अन्यथा भविष्यात पुणे शहराचा श्वास कोंडला जाईल हे नक्की एकंदरीतच पुणे शहरात पर्यावरण धोक्यात असल्याची ही घंटाच आहे जी राजकीय व शासकीय अधिकाऱ्यांना ऐकू येत नाही, परंतु भविष्यात येणाऱ्या संकटांचे सर्वच बळी ठरणार आहेत .हे त्यांना कळत नाही हेच मोठे दुर्दैव म्हणावे लागेल......






10 views0 comments
bottom of page