top of page

वस्तूंची यादी

पर्यावरण

पूर्वीपासून पुणे शहराची ओळख पर्यावरण पूरक व थंड हवेचे ठिकाण म्हणून होती. परंतु वाढते शहरीकरण तसेच आधुनिकीकरण यासाठी शहरातील होत असलेली अनाधिकृत वृक्षतोड याचा परिणाम पुणे शहरातील वातावरण वर होत आहे, तसेच शहराच्या मध्यभागातून वाहत असणाऱ्या मुळा-मुठा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न करीत असून अनाधिकृत  वृक्षतोडीला  सातत्याने विरोध करत आहेत

थॅलिसिमिया

थॅलिसिमिया रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्र या रुग्णांची संख्या जवळपास 45 हजार असून, यामध्ये प्राथमिक ज्ञानाच्या अभावामुळे यांचा जन्म होताना दिसत आहे. हा आजार थांबविण्यासाठी वधू-वरांची लग्नाआधी थॅलेसेमिया चाचणी होणे गरजेचे आहे. संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः ग्रामीण भागात थॅलेसेमिया सोसायटी महाराष्ट्र व एम व्ही आर फाउंडेशनच्यावतीने चाचण्या तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शन राज्यभर गावोगावी जाऊन जनजागृतीचे काम समीर निकम करत आहेत.

ऐतिहासिक

पुणे शहर व परिसरातील ऐतिहासिक वस्तू व वास्तूंचे जतन व संरक्षण व्हावे या उद्देशाने खडकी येथील होळकर पुलाशेजारी" होळकर छत्री" या ऐतिहासिक वास्तूचा शोध घेवून, जतनासाठी इतिहास संशोधक श्री पांडुरंग बलकवडे व मंदार लवाटे यांच्या मार्गदर्शनाखाली समीर निकमानी खंबीरपणे यशस्वी लढा दिला. तसेच आजतागायत ऐतिहासिक वारर्षांच्या जतनासाठी समीर निकम झटत आहेत.

© 2025 Padmavi Services LLP

  • Sameer Nikam
  • Facebook Social Icon
bottom of page