सावधान! सावधान!! सावधान!!!
- Sameer Nikam

- Sep 27
- 1 min read

सुरोभीकरणाच्या नावाखाली नदीपात्रावर अतिक्रमण! पुणे
शाहरातील विविध विकासकामे चालू असताना संगमवाडी येथील
मुळा मुठा संगम येथे दिवस रात्र भराव टाकण्याचे तसेच रात्रीच्या
अंधारात नदीपात्रातून "वाळू उपसा" करण्याचे काम राजरोसपणे
चालू आहे. एकीकडे वाळू उपशावर बंदी असल्याचे प्रशासन
कारवाईचा आव आणते तर दुसरीकडे जहराच्या मध्यभागी सुरू
असलेला "वाळू उपसा" प्रश्ासनाला दिसत नाही का? नक्कीच
नेहमीप्रमाणे प्ररासकीय अधिकाऱ्यांचे हित या ठिकाणी जोपासले
जात आहे हे नक्कीच! म्हणूनच या प्रकारच्या कामांकडे अधिकारी
कानाडोळा करत असावेत. याच मागील काळात याच ठिकाणी
नदी पात्रात राडाराडा टाकल्याच्या कारणावरून रेतकरी बांधवांना
दंड आकारून कारवाई करण्यात आली. महानगरपालिका या
ठेकेदारावर कारवाई करणार का? सर्व पुणेकरांना आवाहन
सध्याच्या नदीपात्राचा फोटो आपल्या संग्रही ठेवा भविष्यात या
पात्राचा कॅनल झाला तर पात्र व आपण काढलेला फोटो
ऐतिहासिक असेल





Comments