वासंतिक उटी
- Sameer Nikam

- Jun 7, 2018
- 1 min read
Updated: Jun 11, 2018
पाडव्या नंतर वासंतिक उटी चा कार्यक्रम सर्व मंदिरांमध्ये होत असून, यामध्ये देवी-देवतांच्या मूर्तीला चंदनाची उटी लावून भजन-कीर्तन हरिनामाचा गजर केला जातो.

या कार्यक्रमाची सांगता जून महिन्यात होते. माऊली सेवा प्रतिष्ठान माऊली सेवा वारकरी संघाच्या वतीने सुरू असलेली चंदन उटी याची सांगता दिनांक 6 जुन 2018 रोजी येरवडा येथील शहा दल बाबा दर्गा याठिकाणी चंदन उटी लावून भजन व हरिनामाचा गजर करून सांगता करण्यात आली. सामाजिक सलोखा दृढ व्हावा तसेच हिंदू व मुस्लिम ही दरी कमी व्हावी व समाजात समानतेचा संदेश देण्यासाठी अशाप्रकारे उटी ची सांगता दर्ग्यावर होणे हा एक ऐतिहासिक क्षण झाला.



























Comments