"पुणे स्मार्ट सिटी" मध्ये झाडांना जागा नाही..?
- Sameer Nikam

- Jul 15, 2018
- 1 min read

पुणे स्मार्ट सिटी होत असताना झाडांना जागा नाही याचा प्रत्यय संचेती हॉस्पिटल च्या मागील बाजूस स्मार्ट सिटीच्या जाहिरात फलक पाहिल्यावर येतो येथील झाडाला अडचण होईल असा पुणे स्मार्ट सिटी चा जाहिरात फलक अगोदर उभा करण्यात आला,? आता फलकाला अडचण होईल म्हणून झाडाला कापण्यात आले. एकीकडे पुणे शहर स्मार्ट सिटी म्हणून लाखो करोडो रुपये खर्च करून पुलांचे काम शोभेच्या झाडांनी सजवले जाते! आणि त्याच ठिकाणी वर्षानुवर्ष उभे असलेले जुने चिंचेचे झाड कापले जाते, एका चौकामध्ये एकीकडे शोभेची हिरवीगार झाडे लावली जातात अन त्या शेजारीच जुने झाड छाटले जाते ,ही विसंगती नाही का? दुर्दैव शहरात स्मार्ट सिटी चे जाहिरात फलक हे कोणत्या ना कोणत्या झाडाखाली लावण्यात आले आहेत? भविष्यात या ठिकाणी स्मार्ट सिटी चे जाहिरात फलक असतील परंतु झाडे नसतील......









Comments