पुण्याचे पर्यावरण धोक्यात सर्व पर्यावरण प्रेमी एकत्र
- Sameer Nikam

- Oct 4, 2018
- 1 min read

पुणे महानगरपालिकेच्या वृक्ष संवर्धन समितीच्या माध्यमातून पुणे शहरातील वृक्षतोडी संदर्भात हरकती नोंदवण्यासाठी पेपरला नोटीस दिली जाते त्याप्रमाणे पुणे शहरातील वेगवेगळ्या भागात गरज नसताना वृक्षतोड का करावी म्हणून वृक्षप्रेमींनी हरकती नोंदवल्या वास्तविक या हरकती बाबत माननीय आयुक्त व वृक्ष अधिकारी तसेच वृक्ष संवर्धन समिती यांनी नागरिकांची व हरकत दार वृक्षप्रेमींची बाजू ऐकून घेणे गरजेचे आहे. परंतु फक्त हरकती मागवणे व त्यावर सुनावणी न देणे नागरिकांना आपली बाजू मांडून न देणे या हुकूमशाही कारभाराविरोधात दिनांक 3/10/2018 पासून रोज संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत महानगरपालिकेच्या दारात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले यात समीर निकम विनोद जैन श्री गोसावी गणेश नलावडे धर्मराज पाटील महेश गडी ले आधी पर्यावरण प्रेमी सहभागी झाले.









Comments