कॅन्टोन्मेंट मधले रस्ते बद्दल
- Sameer Nikam

- Jun 11, 2018
- 1 min read
कॅन्टोन्मेंट मधले रस्ते बंद करण्याची दुर्दैवी मागणी अधिकाऱ्यांच्या कुटुंबीय करीत आहेत त्याचबरोबर अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांनी जे सैनिक सीमेवर तैनात आहेत त्यांचे कुटुंबीय हे कॅन्टोन्मेंट परिसरातील नागरी वस्तीत मोठ्या संख्येने रहात आहेत याचाही विचार करावा प्रत्येक ठिकाणी सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना तात्काळ बंगला अथवा घर मिळते परंतु सर्वसामान्य सैनिक खरा सोल्जर याच्या कुटुंबीयांना घर अथवा कॉटर्स मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे त्या सैनिक बांधवाला कॅन्टोन्मेंट भागातीलच नागरी वस्तीमध्ये त्याच्या कुटुंबीयांना ठेवावे लागते त्यावेळेस त्या कुटुंबाच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची याचाही विचार संबंधित अधिकाराच्या कुटुंबीयांनी नक्की करावा खरंच अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना खूप मोठा धोका असेल तर या देशाचा नागरिक म्हणून मी या मताचा आहे की संरक्षणासाठी सर्व अधिकाऱ्यांचे बंगले व कुटुंबीय यांना नागरी वस्तीपासून लांब एकांतात ठेवण्यात यावे जेणेकरून त्यांचे स्वातंत्र्य व संरक्षण अबाधित राहील






Comments