कोण झाडांची काळजी घेईल??
- Sameer Nikam

- Jun 27, 2018
- 1 min read

करोडो रुपये खर्च करून पुणे महानगरपालिकेने जी नवीन वास्तू बांधली तिच्या उद्घाटन प्रसंगी देशाचे उपराष्ट्रपती येणार म्हणून सर्व सुशोभीकरण करण्यात आले. परंतु पालिकेच्या दारातील या वृक्षाची उघडी पडलेली मुळे झाकण्यासाठी कुणालाही वेळ मिळाला नाही. दुर्दैव या गोष्टीचं वाटतं याठिकाणी आयुक्त ,उपायुक्त, वृक्ष अधिकारी, वृक्ष संवर्धन समिती सभासद व उद्यान विभागातील सर्व कर्मचारी याठिकाणी उपस्थित होते. हा उद्घाटन सोहळा होऊन गेला तरीही आज या ठिकाणी या सर्व सभासदांची व अधिकाऱ्यांची ये जा या रस्त्याने होते .परंतु या झाडाची उघडी पडलेली मुळे झाकण्यासाठी कोणीही पुढे सरसावले नाही. खुद्द पालिकेच्या दारातील ही परिस्थिती असेल तर शहरातली स्थिती वेगळी ती काय असेल यासंदर्भात पालिका आयुक्त व अधिकाऱ्यांकडून अपेक्षा कराव्यात का......?





Comments